अरबी समुद्राच्या सान्निध्यात, आगाशी आणि अर्नाळा या दोन ऐतिहासिक गावांच्या मध्यभागी वसलेला ज्योती हा निसर्गसौंदर्याने नटलेला, जुई-मोगऱ्यांच्या सुगंधाने दरवळणारा एक रमणीय धर्मग्राम आहे. श्रद्धा, प्रेम आणि ऐक्य यांची परंपरा जपणाऱ्या या भूमीला आज ज्योती माता चर्च या रूपाने एक आध्यात्मिक ओळख लाभली आहे.
पूर्वी हा संपूर्ण परिसर आगाशी चर्चच्या कार्यक्षेत्राचा भाग होता. मात्र, आगाशी चर्चपासूनचे अंतर अधिक असल्याने ज्योती व आसपासच्या गावांतील श्रद्धाळूंना नियमितपणे धार्मिक सेवेचा लाभ घेणे कठीण जात होते. या गरजेची जाणीव आगाशी चर्चचे तत्कालीन प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर रिचर्ड मिस्किटा यांना झाली. त्यांनी ज्योती व परिसरातील ग्रामस्थांची सभा बोलावून या भागासाठी स्वतंत्र उपासना केंद्र उभारण्याचा संकल्प मांडला. श्रद्धाळू लोकांनीही हा संकल्प मनापासून स्वीकारला आणि अशा प्रकारे एका नव्या आध्यात्मिक प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
यानंतर आगाशी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर मिल्टन मिरांडा तसेच सहाय्यक धर्मगुरू फा. जेम्स डिसिल्वा यांच्या अथक प्रयत्नांतून ज्योती परिसरात नियमित पवित्र मिस्साची सुरुवात करण्याचे निश्चित करण्यात आले. या कार्यात रेव्ह. फादर फिलीप तवारीस यांचे विशेष योगदान लाभले. परिसराच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेल्या फादर तवारीस यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी पोर्तुगीज काळात या ठिकाणी एक चर्च अस्तित्वात होते. त्या चर्चचे नाव "नोसा सेन्होरा दा लुझ" (Nossa Senhora da Luz) अर्थात "अवर लेडी ऑफ लाईट" (Our Lady of Light) असे होते. मराठीत याचा अर्थ "प्रकाशाची माता" असा होतो. या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखत नव्या उपासना केंद्राला "अवर लेडी ऑफ लाईट सेंटर", म्हणजेच "ज्योती माता सेंटर" हे नाव देण्यात आले.
या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार १८ नोव्हेंबर १९८८ रोजी मिळाला. त्या दिवशी फादर मिल्टन मिरांडा यांच्या पुढाकाराने ज्योती येथे प्रथम पवित्र मिस्सा अर्पण करण्यात आला. या ऐतिहासिक मिस्साचे मुख्य पुरोहित रेव्ह. फादर फिलीप तवारीस होते, तर सेंटरचे उद्घाटन आगाशी कॉन्व्हेंटच्या सुपीरिअर सिस्टर हेलनडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या दिवसापासून ज्योती परिसरात आध्यात्मिक जीवनाची एक नवी पहाट उगवली आणि श्रद्धा, प्रार्थना व सेवाभावाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.
काळाच्या ओघात या केंद्राची वाढ होत गेली. जानेवारी २००१ मध्ये ज्योती सेंटरचा हस्तांतरण सोहळा संत डॉन बॉस्को संस्थेकडे करण्यात आला. त्यानंतर या परिसराची आध्यात्मिक जबाबदारी संत डॉन बॉस्को संस्थेने स्वीकारली. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे श्रद्धाळूंच्या धार्मिक जीवनाला नवी दिशा मिळाली आणि ३० जानेवारी २००५ रोजी फादर ब्लॅनी पिंटो यांच्या पुढाकाराने भूमिपूजन करून चर्चच्या उभारणीच्या स्वप्नाला अधिक बळ प्राप्त झाले.
अखेर अनेक वर्षांच्या प्रार्थना, परिश्रम, त्याग आणि लोकसहभागाचे फळ ६ मे २००७ रोजी मिळाले. हा दिवस ज्योती परिसराच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरला. वसई धर्मप्रांताचे बिशप परमपूज्य थॉमस डाबरे यांच्या हस्ते ज्योती माता चर्चचा आशीर्वादविधी व उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास संत डॉन बॉस्को संस्थेचे पदाधिकारी फा. आयवो कोयेलो यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली. अनेक वर्षांपासून मनात जपलेले स्वतःच्या चर्चचे स्वप्न त्या दिवशी प्रत्यक्षात उतरले आणि संपूर्ण ज्योती परिसर आनंद, कृतज्ञता आणि अभिमानाने भारावून गेला.
आज ज्योती माता चर्च हे केवळ प्रार्थनेचे स्थान नसून श्रद्धा, आशा, प्रेम, ऐक्य आणि सेवाभाव यांचे प्रेरणास्थान बनले आहे. अनेक पिढ्यांच्या त्याग, समर्पण आणि देवावरील अढळ विश्वासाचे हे जिवंत स्मारक असून, या पवित्र भूमीतून प्रभूच्या प्रकाशाची ज्योत आजही असंख्य श्रद्धाळूंच्या जीवनात आशा आणि विश्वास जागवत आहे.
Nestled between the two historic villages of Agashi and Arnala, along the shores of the Arabian Sea, Jyoti is a picturesque Christian settlement renowned for its natural beauty and the fragrance of jasmine and mogra blossoms. Preserving a rich tradition of faith, love, and unity, this land has today acquired a distinct spiritual identity through Our Lady of Light Church.
In earlier years, the entire area formed part of the pastoral jurisdiction of Agashi Church. However, because of the considerable distance from Agashi Church, it was difficult for the faithful of Jyoti and the surrounding villages to regularly avail themselves of religious services. Recognizing this need, the then Parish Priest of Agashi Church, Rev. Fr. Richard Misquita, convened a meeting of the local residents and proposed the establishment of an independent worship centre for this region. The faithful wholeheartedly embraced this vision, thus laying the foundation for a new spiritual journey.
Subsequently, through the tireless efforts of Rev. Fr. Milton Miranda, Parish Priest of Agashi Church, and Assistant Priest Fr. James D'Silva, it was decided to begin the regular celebration of the Holy Mass in the Jyoti area. A special contribution was also made by Rev. Fr. Philip Tavares. Having an in-depth knowledge of the region's history, Fr. Tavares informed the committee members that, many years ago during the Portuguese era, a church had existed at this very location. It was known as "Nossa Senhora da Luz" (Our Lady of Light). In Marathi, this title translates as "Prakashachi Mata" (Mother of Light). In honour of this rich historical heritage, the new worship centre was named "Our Lady of Light Centre," or "Jyoti Mata Centre."
This dream began to take concrete shape on 18 November 1988. On that day, through the initiative of Fr. Milton Miranda, the first Holy Mass was celebrated at Jyoti. The principal celebrant of this historic Mass was Rev. Fr. Philip Tavares, while the Centre was formally inaugurated by Sr. Helande, Superior of the Agashi Convent. From that day onward, a new dawn of spiritual life arose in the Jyoti area, marking the beginning of a new chapter of faith, prayer, and service.
Over the years, the Centre continued to grow. In January 2001, the Jyoti Centre was formally entrusted to the Salesians of Don Bosco. Thereafter, the Salesian congregation assumed pastoral responsibility for the area. Through their dedicated ministry, the faithful received renewed spiritual guidance, and on 30 January 2005, under the leadership of Fr. Blany Pinto, the groundbreaking ceremony for the church was held, giving fresh momentum to the long-cherished dream of building a church.
At last, the fruits of many years of prayer, sacrifice, hard work, and community participation were realized on 6 May 2007. This day became a golden milestone in the history of Jyoti. In a joyful and festive atmosphere, Most Rev. Thomas Dabre, Bishop of Vasai, solemnly blessed and inaugurated Our Lady of Light Church. The ceremony was also graced by the presence of Fr. Ivo Coelho, representing the Salesians of Don Bosco. The dream of having their own church, cherished for many years by the local faithful, finally became a reality, filling the entire Jyoti community with joy, gratitude, and pride.
Today, Our Lady of Light Church is much more than a place of prayer. It has become a beacon of faith, hope, love, unity, and service. It stands as a living monument to the sacrifice, dedication, and unwavering trust in God demonstrated by generations of faithful believers. From this sacred place, the light of the Lord continues to shine forth, inspiring hope and strengthening faith in the lives of countless people.